About Us

आयुर्वेदिक म्हणजे काय आहे व काय नाही

Image Description

आयुर्वेदिक म्हणजे काय आहे वकाय नाही

आपण सतत आयुर्वेदिक हा शब्द tv, वर्तमानपत्र , सोशल मिडिया यावर बघत असतो, वाचत असतो.आयुर्वेदिक साबण पासून ते अगदी आयुर्वेद एसी, आयुर्वेद आईस क्रीम पासून आयुर्वेदिक टूथपेस्ट पर्यंत अनेक ठिकाणी “आयुर्वेदिक” शब्द बघायला मिळतो.या लेखामध्ये आयुर्वेदिक नक्की काय आहे व नक्की काय नाही हे आपण बघू .

आयुर्वेदिक म्हणजे नक्की काय?

अंदाजे २००० वर्षापूर्वी आयुर्वेद ग्रंथाची रचना झाली. कालानुरूप वैद्यांनी अनेकग्रंथांची भर घातली या मध्ये घातली उत्पन्न नवीन रोग त्यांचे उपचार त्यात सांगितले.औषधि वनस्पती व त्यांचे गुणधर्म यांचे विस्तृत वर्णन आयुर्वेद ग्रंथात केले आहे. त्यापासून विविध औषधे बनवली जातात.या ग्रंथात वर्णन केलेली औषधेवापरण्यासाठी अतिशय विशिष्ठ अवस्था आहेत.आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेल्या वैद्य अनेक वर्षे अभ्यास करून योग्य ठिकाणी जेव्हा औषधेवापरतात. ज्यामुळेएका रोगाची चिकित्सा करताना दुसरा रोग होऊ नये हि काळजी घेतली जाते.त्यामुळेकेवळग्रंथात वर्णन केलेल्या अवस्थामध्ये व BAMS शिक्षण पूर्ण केलेल्या वैद्यांनी सुचवलेल्या उपचारांनाचआयुर्वेदिकम्हणावे इतरकशालाही नाही.

आयुर्वेदिक काय नाही

वनौषधी मिश्रित साबण, टूथ पेस्ट, शाम्पूह्या सारख्या रासायनिक उत्पादनाला निश्चित आयुर्वेदिक म्हणता येणार नाही .Whatsapp फोरवर्डमधीलघरगुती उपचार सुचवले जातातयुट्यूब वरून अनेक रोगांवर झटपट उपचार दाखवले जातात. यांना आपण नक्की आयुर्वेदिक मानू नयेरस्त्याचा कडेला तंबू उभारून गुप्त रोगांसाठी व कामशक्ती वाढवण्यासाठी केलेल्या ‘खानदानी उपचार ’ हे अनेक वेळा हानिकारक आहेत.हर्बल, नेचरल, ओर्गानिक नावाखाली विकलेले जिन्नसझाड पाल्यांचे औषधदेणारेगावो गावीचे वैदू यांना कदाचित वनस्पतींची माहिती असेल ही परंतु त्यांच्या उपचारांना आयुर्वेदिक म्हणत नाहीत.मूतखड्याचे औषध काविळीचे औषध देतो अशी जाहिरात करणारे, उंची वाढवू नाहीतर पैसे परत हे नक्की आयुर्वेदिक नाही .केमिस्ट किंवा स्वतः स्वतःवरकेलेले उपचारयामुळे कोणताही उपचार करण्यापूर्वी जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या व निरोगी राहाधन्यवाद

वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com