मागील २ भागातआपण तेल व काढा बस्ति विशयी माहिती बघितली या भागात बस्ति हा उपक्रम कसा करतात ते सविस्तरबघू.
बस्ति उपक्रमयोगबस्ति - या मध्ये साधारण एक तासाचे ८ सेशन्स असतात.१. सर्वप्रथम तुमची वैद्यकीय तपासणी आयुर्वेदाच्या पद्धतीप्रमाणे केली जाईल. त्यामध्ये तुमचे वय, तुम्हाला होणारे त्रास व ऋतु ह्याप्रमाणे बस्तिची द्रव्ये व मात्रा ठरवली जाईल.२. ह्या ८ बस्तिंमध्ये किती तेल व किती काढा हे वैद्य ठरवतील.
दिवस १ तेलदिवस २ काढादिवस ३ तेलदिवस ४ काढादिवस ५ तेलदिवस ६ काढादिवस ७ तेलदिवस ८ तेल
तेलाच्या बस्तिच्या अर्धा तास अगोदर खाऊन येणे अपेक्षित आहे. ह्यामध्ये पोळी भाजी, तूप मेतकूट भात, आमटी भात, घावन, थालीपीठ, लाडू असे खाता येईल. शिळे, आंबवलेले व बेकरी उत्पादने खाऊ नये. काढा बस्तिच्या किमान २ तास अगोदरपासून पोट रिकामे ठेवावे.
बस्ति चिकित्सेला येताना आणायच्या गोष्टी:१. Extra कपड्यांचा जोड२. कपडे शक्यतो जुने व तेल लागले तरी चालेल असे असावे.३. स्कार्फ/कानटोपी/स्टोल४. स्वेटर/जरकीन/सन कोट५. बस्ति नंतर अंग पुसायला टॉवेल/जुनी चादर/फडके
बस्ति चालू असताना पाळायची पथ्ये:थंड ऋतु मध्ये(हिवाळा व पावसाळा) कोमट किंवा गरम पाणी प्यावे.उन्हाळा मध्ये बस्ति घ्यायची वेळ आल्यास उकळून थंड केलेले पाणी प्यावे.रात्री लवकर झोपावे व लवकर उठावे.जीम/व्यायाम बंद ठेवावा. २०-२५ मिनिटे चालू शकता.फळभाज्या व मूग किंवा मसूर खाव्या. कंदमुळे, फळे, पालेभाज्या टाळाव्या.ब्रम्हचर्य पाळावेजास्त प्रवास, एसी, जोरात पंखा, खूप ऊन, खूप बोलणे, चिडचिड, शोक हे टाळावे.
महत्वाच्यासूचना:१. काढा बस्तिनंतर थोडासा थकवा, अंग गळून गेल्यासारखे वाटणे हे होऊ शकते. घाबरून न जाता वैद्याला सांगून ठेवावे.२. तेल बस्ति घेतल्यावर दिवसभर खालून थोडा वात सरू शकतो.त्याबरोबर थोडेसे तेल बाहेर येऊ शकते. त्यामुळे वायू सोडताना बाथरूम मध्ये जाऊन निःसारण करावे.३. पाळी किंवा periods येणार असतील किंवा आले तर बस्ति थांबवायला लागू शकतो. नंतर परत येऊन चिकीत्सा पूर्ण करता येते. परंतु पाळीच्या तारखांजवळ जवळ बस्ति करू नये म्हणजे खंड होत नाही.३. दोन चाकी वर प्रवास टाळावा.
बस्ति कधी घ्यावा:बस्ति कोणीही कधीही वैद्यकीय सल्ल्याने घेऊ शकतो. पावसाळ्यात सर्वांनी बस्ति घ्यावा.
वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com