LOKSATTA PANCHAKARMA ARTICLES लोकसत्ता लेखमाला

पंचकर्म म्हणजे काय रे भाऊ?!

"मला पंचकर्म करायचंय किंवा पंचकर्म म्हणजे काय असतं हो डॉक्टर?" हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारण्यात येतो. या बद्दल अनेक समज गैरसमज समाजामध्ये आहेत. टीवी, रेडियो, व्हॉटसॅप ,जाहिराती अथवा माहिती मधून पंचकर्म शब्द आपल्या कानावर पडत असतो. पण पंचकर्म नक्की आहे तरी काय हे आपण या लेखमालेतून बघणार आहोत.

Image Description

"मला पंचकर्म करायचंय किंवा पंचकर्म म्हणजे काय असतं हो डॉक्टर?" हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारण्यात येतो. या बद्दल अनेक समज गैरसमज समाजामध्ये आहेत. टीवी, रेडियो, व्हॉटसॅप ,जाहिराती अथवा माहिती मधून पंचकर्म शब्द आपल्या कानावर पडत असतो. पण पंचकर्म नक्की आहे तरी काय हे आपण या लेखमालेतून बघणार आहोत.पंचकर्म ही वेगळी चिकित्सापद्धती नसून आयुर्वेद चिकित्सेमधीलएक अविभाज्य भाग आहे. पंचकर्मामध्ये दोन शब्दांचा अंतर्भाव होतो,‘पंच’ म्हणजे पाच आणि 'कर्म’ म्हणजे क्रिया. वात, पित्त आणि कफ असे तीन दोष असतात हे आपल्याला माहितीच असेल. हे दोष चुकीचा आहार, विहार, वातावरण आदी कारणांमुळे प्रमाणापेक्षा जास्त वाढतात आणि ते शरीरात रोग उत्पन्न करतात. ते औषधांनी काही काळ शांत होतात व रोगही कमी होतो.पण अशा दोषांच्या परत वाढण्याची शक्यता असते व कधी कधी रोग बलवान असेल तर तोच त्रास परत परत होत राहू शकतो. अशा वेळी ते बाहेर काढून टाकणे श्रेयस्कर ठरते. पंचकर्मांमध्ये दोषांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. पंचकर्म प्रक्रिया:पूर्वकर्म - पंचकर्मला सुरुवात करण्याअगोदर औषधी व आहाराच्या मदतीने शरीरात जाठराग्नी वाढवून पचनशक्ती चांगली केली जाते. या क्रियेला 'पाचन' असे म्हणतात. नंतर वैद्याच्या सल्ल्यानुसार स्नेहन स्वेदन केले जाते. रुग्ण प्रकृतीनुसार आवश्यक प्रमाणाततेल ,तूप इत्यादी स्निग्ध पदार्थ प्यायला दिले जातात व बाह्यतः सुद्धा अभ्यंग केला जातो. नंतर औषधी वनस्पतींच्या काढ्याच्या वाफेने रुग्णाचा घाम काढला जातो व तेलही आत जिरवले जाते. ह्याबद्दल खोलात आपण पुढील लेखांमध्ये बघूया.प्रधान कर्म - पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या प्रमुख कर्मांचा अंतर्भाव होतो. यामुळे शरीराची शुद्धी होते म्हणून यांना शोधन असेही म्हणतात. या बद्दल सविस्तर माहिती पुढील लेखांमध्ये येईलच.पश्चात कर्म -पंचकर्म झाल्यानंतर भूक मंदावलेली असू शकते. अशा वेळेला अग्निचा अंदाज घेत हळूहळू करत आहार वाढवला जातो. हा 'संसर्जन क्रम' पंचकर्म केल्यानंतर रोगी व शोधन अवस्थेनुसार तीन ते पाच दिवस केला जातो.पंचकर्म कोणी करावे?पंचकर्म अनेक कारणांसाठी केले जाते.रोगानुसार- सर्व रोगांवर अवस्थानुसार विविधपंचकर्मे सांगितली आहेत. उदा- दमा सारख्या विकारात वमन.ऋतूनुसार - ठरावीक ऋतूमध्ये वातावरणाच्या बदलामुळे शरीरातील ठराविक दोष वाढतात. वेळोवेळी ते शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी काही कर्मे केली जातात. उदाहरणार्थ वसंत ऋतूमध्ये वाढलेला कफ काढून टाकण्यासाठी वमन, वर्षा ऋतूमध्ये वातासाठी बस्ती व शरद ऋतूमध्ये पित्तासाठी विरेचन केले जाते. दर वर्षी ऋतूनुसारपंचकर्म करणे म्हणजे एक प्रकारे शरीराचे सर्व्हिसिंग करण्यासारखेच आहे.गर्भधारणेपूर्व-गर्भधारणेत अडचण येत असल्यास किंवा उत्तम संतती निर्मितीसाठी कुटुंबाचे नियोजन करत असताना पंचकर्म करून घेणे अतिशय फायद्याचे ठरते.पंचकर्माचे फायदे- पंचकर्म केल्यामुळे भूक चांगली लागते, पचन सुधारते, शरीराला आणि मनाला स्वस्थता मिळते, मन आणि बुद्धी आपापल्या कार्यामध्ये उत्कर्ष करतात, शरीराचा वर्ण, कांती यामध्ये सुधारणा होते, कार्यशक्ती अर्थात स्टॅमिना वाढतो, वृद्धावस्था लवकर येत नाही, निरोगी असे दीर्घायुष्य मिळते व जुनाट व्याधी कायमचे नष्ट होतात.पंचकर्म कोणी करू नये- पंचकर्म उपचार करत असताना व पंचकर्मझाल्यानंतर जेरुग्ण आहार विहाराचे पथ्यपाळू शकणार नाहीत,अति धाडसी किंवाअति घाबरट रुग्ण, ज्या रुग्णांचे बल कमी झाले आहे, असाध्य रोग पीडित रुग्ण, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे व ज्यांना खूप थकवा आहे असे रुग्ण यांनी पंचकर्मे करू नयेत अथवा गरज असल्यास तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली करावीत.लक्षात ठेवा, पंचकर्म ही जाता येता करण्याची गोष्ट नाही. उत्तम वैद्याबरोबरच उत्तम रुग्णाची साथही पंचकर्म करताना गरजेची असते. पंचकर्म करताना दिलेल्या सूचनांचे नीट पालन झाले नाही तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पंचकर्म हे नेहमी तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने आणि त्यानी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळूनच करावे.पुढील भागामध्ये पंचकर्म सुरू करण्याच्या आधी शरीराची कशी तयारी करून घेतली जाते ते आपणबघूया.धन्यवाद.वैद्य प्रभाकर यशवंत शेंड्येयशप्रभा आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे ५२drshendye@gmail.com