लेपाविषयी आयुर्वेदात काय सांगितले आहे हे आपण आज बघू
लेप चिकित्सालेप हासर्वाना माहित असलेला उपचार आहेआजीबाई च्या बटव्यामध्ये रक्तचंदनाची बाहुली असायची. कोणाचा पाय मुरगळला कि त्याला लेप लावला जायचा.दाढ दुखत असेल तर जायफळ उगाळून ते गालाला लावायचे.सर्दी ने डोके दुखले तर पाण्यात कालवून सुंठीचा लेप लावायचे.पोटात गुबारा धरला कि हिंगाच्या लेपाने तो हमखास कमी होत असेअनुभवामुळे केवळ लेप लावून हाड जुळवणारे हाडवैद्य ही आपल्याला बघायला मिळतात .
या लेपाविषयी आयुर्वेदात काय सांगितले आहे हे आपण आज बघूलेपाला आलेप असेही म्हणले आहे. सुश्रुत संहिते मध्ये याचे विस्तृत वर्णन आले आहे.
लेप विविधरोगात लावता येतात. लेपामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.जखम लवकर भरून येणे,हाड मोडले असता ते भरून यायला.दूषित जखम स्वच्छ होणेरक्तस्त्राव थांबवणेसूज कमी करणेएखाद्या भागाचे स्नेहन करणेएखाद्या त्वचेचा भागाचा रंग पूर्ववत करणेविषघ्न - किडा अथवा मुंगी इ चावल्यामुळे शरीराला आलेल्या सुजेवर लावण्यासाठीचाई किंवाटकलावर केस येण्यासाठीलावण्यासाठी
लेप विधीज्या भागाला लेप लावायचा आहे तो भाग कोरडा व स्वच्छ करून घेतला जातो.आवश्यकतेनुसार तेथील केंस काढून टाकले जातात.लेप लावायचा सोडून बाकीचा भाग ड्रेप नि झाकला जातोलेप लावताना तो मधोमध ठेवून नंतर बोटांनी हळू हळू पसरला जातो.लेपाची जाडी रोग व अवस्थेनुसार भिन्न असते.लेप नैसर्गिक पद्धतीने वाळवलाजातो.लेपाला पंखाकिंवा वारालागणार नाही याची काळजी घेतली जाते.लेप लावल्यावर पूर्ण कोरडा होण्याच्या आधी कोमट पाण्यात रुमाल भिजवून तो काढला जातो.त्यानंतरपाण्याने तो भाग स्वच्छ धुवून पुसून कोरडा केला जातो.
काही अपवाद सोडता लेप हे रात्रभर ठेऊ नयेत.
लेपाची काही प्रसिद्ध औषधेविषघ्न - दशांग लेप, दूर्वा , चंदनसूज - त्रिफळा गुग्गुळ, लेप गोळी, रक्तचंदनवर्ण्य-अनंता , हरिद्रा , चंदनउदरशूल- हिंग ,
वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com