संधीवात , कंबर, पाठ यांच्या रोगावर हे शेक खूप वापरले जातात. त्यांची सविस्तर माहिती आज घेऊया
पिण्ड व पत्र पोट्टली शेक
संधीवात , कंबर, पाठ यांच्या रोगावर हे शेक खूप वापरले जातात. त्यांची सविस्तर माहिती आज घेऊया
पिंड स्वेदपिंड स्वेद म्हणजे सोप्या शब्दात एका गोळ्याच्या सहाय्याने शरीराचा भाग, अवयव किंवा अख्खे शरीर शेकणे.विशिष्ट काढे, आणि दूध ह्या मध्ये शिजवलेल्या भाताने शरीर शेकले जाते. हा शिजवलेला भातएका मांजरपाट कापडामध्ये धेऊन त्याची पुरचुंडी बांधली जाते व त्याने शेक दिला जातो.
विधिपिंड स्वेद करताना प्रथम तेल लाऊन स्नेहान केलेलं जातेकेले जाते. त्यानंतर रूग्णाला चटका बसणार नाही अशी काळजी घेऊन गोलाकार पद्धतीने दाब देत शेक दिला जातो. पिंड थंड झाल्यावर पुन्हा गरम काढा व दुधाच्या मिश्रांत बुडवून शेक दिला जातो. एका अंगाला सर्व साधारण पाने १०-१५ मिनिटे शेक दिला जातो.
शेक पूर्ण झाल्यावर शरीरावर राहिलेला चिकटपणा किंचित तेल लावून टॉवेल अथवा टिशू पेपरने स्वच्छ केलाजातो.
पिंड स्वेद कोणी करावा?वाताचे सर्व आजारकंबरदुखणे, आखडणेमणक्याचे विकारगुडघेदुखीखांदा, मान आणि पाठ दुखीगुडघ्यात कट कट आवाज येणेबसून बसून आलेला स्नायूंचा थकवाविशिष्ट शारीरिक स्थितीमुळे आलेले पोश्चरल समस्याथंडी व पावसाळा मध्ये गारठा असल्याने आखडलेले शरीर
किती दिवस करावा?वैद्यकीय सल्ल्याने साधारण ५-७ दिवस करता येतो.
पत्र पोट्टली,पिंड स्वेदा प्रमाणे कापडामध्ये निर्गुन्डी, एरंड,सहचर इ पाने घेऊन त्याची पुरचुंडी बांधली जाते व एरंड तेला मध्ये गरम करून शेक दिला जातोपत्र म्हणजे पान व पानाच्या पुरचुंडीने दिला जातो म्हणून याला पत्र पोट्टली स्वेद असे म्हणतात.
विधिपिंड स्वेद प्रमाणेच शेक दिला जातो. शेक देत असताना पानाचा रस बाहेर येतो तो शेवटी पुसून घेतला जातो. शेक झाल्या नंतर बाहेर पडता डोके कान हात पाय झाकले जातील असे कपडे घालावेत.
हा जास्त तीक्ष्ण असा शेक आहे.
उपयोगआमवात. जुना संधीवात, स्नायु कडक होणे, सांधे आखडणे या मध्ये हा शेक वापरला जातो.
वैद्य प्रभाकर शेंड्येयशप्रभा आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक पुणेdrshendye@gmail.com