LOKSATTA PANCHAKARMA ARTICLES लोकसत्ता लेखमाला

तुम्ही पाणी जास्त पिता का?

खरच रोज किती पाणी प्यावं?

Image Description

तुम्ही पाणी जास्त पिता का?पाणी हे जीवन, भरपूर पाणी प्या, दिवसात 8 ग्लास पाणी प्या अशी वाक्ये सगळ्यांच्या कानावर पडत असतील.रोज 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे ना? हा प्रश्न रुग्ण मला नियमित पणे विचारत असतात.![](https:तहान लागणे हा एक नैसर्गिक वेग आहे तो अडवायचा पण नाही, आणि तहान नसताना उगाच पाणी ही प्यायचे नाही.भारतीय उपखंडात बहुतांश भागात तापमान उष्ण असते त्यामुळे तहान लागणे हे नित्याचे आहे.आपल्या आहारात आमटी, रसभाजी, चटणी कोशिंबीर, ताक इ मधून पाणी आपल्या शरीरात जात असते. चहा कोफी दूध ह्या मध्ये ही पाणी असते. तसेच जेवणाबरोबर आपण पाणी पीत असतो. या मुळे भारतीय जीवनशैलीतउगीच अति पाणी पिण्याची गरज नसते.उन्हाळ्यामध्ये माठातील पाणी वकिंचित आंबट चवीने युक्त व मीठ साखर घालून अशी सरबते आपण प्यावी पावसाळाव हिवाळ्यामध्ये उकळून कोमट पाणी पिणे हितकारक आहे.सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यासाठी अनेक जणपाणी पितात.त्यांनी असे करताना तज्ञ वैद्यांच्या सल्ला जरूर घ्यावा.सगळ्यात सोपे हेच आहे की तहान लागली की घोट घोट पाणी प्यावे.पाणी अति पिण्याने सूज येणे (मूत्र पिंडावर ताण येऊन), जुलाब, ग्रहणीरोग ,संडासला पातळ होणे, अग्निमांद्य होते.सर्दी पडसे खोकला, अम्लपित्त, अजीर्ण, ढेकरा ,भूक न लागणे, हाता पायाला सूज अशा आजारामध्ये जास्त पाणी पिण्याने रोग बळावतो.कमी प्यायले किंवा तहान लागली असता पाणी न प्यायल्याने अंग गळून जाणे, संज्ञा नष्ट होणे, चक्कर व हृदय अवयवाला त्रास होतो. म्हणजेच जास्त पाणी काय किंवा कमी काय दोन्ही त्रासदायकच.ह्या सगळ्याचा सारांश एवढाच की तहानेकडे लक्ष द्या. एकच प्रमाण सगळ्यांना लागू होत नाही प्रत्येकाने स्वतःच्या गरजे प्रमाणे पाणी प्यावे.वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com