LOKSATTA PANCHAKARMA ARTICLES लोकसत्ता लेखमाला

आयुर्वेदात साईड इफेक्ट्स आहेत कि नाहीत?

आयुर्वेद लोकप्रिय असण्याचेएक मोठे कारण हे आयुर्वेद औषधांना साईड इफेक्ट्स नाहीत हे आहे. पण हे खरंच अस आहे का?

Image Description

आयुर्वेद लोकप्रिय असण्याचेएक मोठे कारण हे आयुर्वेद औषधांना साईड इफेक्ट्स नाहीत हे आहे. पण हे खरंच अस आहे का?

साईड इफेक्ट्स म्हणजे औषधे अथवा उपचारघेताना अपेक्षित परिणामांबरोबर अथवा शिवाय निर्माण होणारे इतर परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम.

“मी आयुर्वेद औषधे घेतो अनेक वर्षे मला काही होत नाही.” “गुढगेदुखी साठी मी गुग्गुळ घेतो, पोट साफ होण्यासाठी मि रोज त्रिफळा घेतो” ही आणि अशी वाक्य आपल्या कानावर नेहमी पडत असतात.“आवळा हळद ज्येष्ठमध च्यवनप्राश इ अनेक लोक रोज घेतात.

झाला तर उपयोग झाला नाही तर नाही पण त्रास तर होणार नाही ना!” असा दृष्टीकोन ठेवून लोक अनेक वेळेला आयुर्वेदीय औषधाकडे बघतात. आयुर्वेद औषधाला सहज पण हे योग्य नाही.

चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आयुर्वेदीय औषधाला साईड इफेक्ट्सनिश्चित आहेत.

उदाहरण·पोट साफ होत नाही म्हणून अनेक वर्षे चूर्ण घेण्याने आतड्यांना कोरडेपणा येतो व बद्धकोष्ठतावाढत जाते.·त्रिभुवनकीर्ती सारखीकाही औषधे उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींना सहन होत नाहीत.·आरोग्यवर्धिनी सारखी औषधे ठराविक काळा पुरती घ्यायला सांगितली आहेत ती सतत घेतल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.·मधुमेहासाठी कडूनिंब रस ,जांभूळ बी किंवा मेथी पावडर जास्त घेतले तर उलट्या जुलाब इ त्रास होऊ शकतो.

आयुर्वेदीय चिकित्सेचा पाया हा एक रोग बरा करताना दुसरा रोग निर्माण होणार नाही हा आहे.हा नियम प्रत्येक रोगाची चिकित्सा करत असताना वैद्य पळत असतो. या करिता औषधे देण्यापूर्वी रुग्णाची त्याच्या रोगाची इथम्भूतमाहिती विचारली जाते. रोग्याचेदोष, देह,बळ,काळ,अग्नि,प्रकृती,वय, सत्व,सात्म्य,आहार अशा अनेक बाबींचा विचार करून त्याला त्रास होणार नाही असे औषध सुचवले जाते. अशा वेळी साईड इफेक्ट्स नक्कीचदिसत नाही.परंतु इंटरनेटवर बघून, अर्धवट ज्ञानामुळे , चुकीच्या मात्रेत , चुकीच्या प्रमाणात,चुकीच्या वेळेला औषध घेतले तर नक्की साईड इफेक्ट्स दिसतात व आयुर्वेदाबद्दल मत खराब होते.म्हणून कोणतेही औषध घेताना तज्ञ वैद्याचा सल्ला जरूर घ्या.

वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com