LOKSATTA PANCHAKARMA ARTICLES लोकसत्ता लेखमाला

Panchakarma 2021पंचकर्म २०२१

Image Description

पंचकर्मे २०२१गेले वर्षभर आपण पंचकर्मे म्हणजे काय, ते कोणी करावे कोणी करू नये हे २४ लेखातून पहिले.आज आपण पंचकर्माची सद्य स्थिती काय आहे, ते करताना येणारे प्रश्न ह्या बद्दल माहिती घेऊ.

पंचकर्म सेंटरचा उपद्रवगेल्या २० वर्षात अनेक मोठ मोठ्या बाबा, स्वामी, गुरुयांच्या व्याख्यानामधून, वर्तमान पत्रातून येणाऱ्या आरोग्य विषयक पुरवणी मधून आयुर्वेद पंचकर्म यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रसार प्रचार झाला. केरळीय पंचकर्मे या विषयीची उत्सुकता, याचाफायदा अनेक व्यावसायिक मंडळीनी पंचकर्म सेंटर उघडून घेतला.या मध्ये अनेक ठिकाणीपंचकर्माच्या नावाखाली मसाज सेंटर चालवले जाते. काही ठिकाणी तद्य वैद्याच्या अनुपस्थितीत केवळ परीचाराकाकडून उपचार करवले जातात.

पंचकर्माचा चिकित्सा म्हणून उपयोग न करता केवळ जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी रुग्णाला मोठ्यात मोठे पेकेज घ्यायला भाग पडले जाते.या सगळ्यामुळे रुग्णाचे आर्थिक , शारीरिक व मानसिक नुकसान तर होतेच पण त्यांचे आयुर्वेद व पंचकर्मे यांच्या बद्दलचे त्यांचे मत हि कलुषित होते.या शिवाय अनेक ठिकाणी २ दिवसात, वीकेंड मध्येपंचकर्मे केली जातात .

या वर उत्तम उपाय म्हणजे कोणत्याही ठिकाणी पंचकर्मे करण्याधी तज्ञ वैद्याचा सल्ला घ्यावा.ज्या ठिकाणी आयुर्वेद चिकित्सा केली जाते. जेथे वैद्य तुमचे आरोग्य विषयक समस्यांचे समाधानकारक निराकरण करतील अशा क्लिनिक मध्ये पंचकर्मे करावीत.पंचकर्मे करण्यासाठी वैद्यांकडे जा कोणत्याही सेंटर ला भुलू नका

पंचकर्मे करण्यासाठी आवश्यक तो वेळ व पथ्य पाळण्याची तयारी असेल तरच पंचकर्मे करा.

काही विमा कंपन्या हल्ली पंचकर्म उपचारांसाठी परतावा देत आहेत त्या दृष्टीने विमा घेताना आपण तशी विचारणा करू शकता.

करोना च्या पार्श्वभूमी वर नस्य वमन असे पंचकर्म उपचार पुढील काळात वरदान ठरणार आहेत.

वैद्य प्रभाकर शेंड्येDRSHENDYE@GMAIL.COM