खांद्यापासून वरच्या म्हणजेच मान गळा नाक तोंड कान डोके या सर्व भागातील दोष काढून टाकणे तसेच येथील ज्ञानेंद्रिय यांना बळ देणे, या भागातील रोग निवारण करणेयासाठी नस्य केले जाते.
नस्य
नासा हि शिरसो द्वारम् Iनाक हे शीर प्रदेशाचे दार आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे.खांद्यापासून वरच्या म्हणजेच मान गळा नाक तोंड कान डोके या सर्व भागातील दोष काढून टाकणे तसेच येथील ज्ञानेंद्रिय यांना बळ देणे, या भागातील रोग निवारण करणेयासाठी नस्य केले जाते.
नस्य म्हणजे नाकाद्वारे शरीरामध्ये औषध आत सोडणे.यामध्ये विविध औषधी तेल, तूप , वनस्पती चूर्ण, वनस्पतीचे रस इवापरलेजातात.
नस्य प्रकारउपयोगानुसार नस्याचे तीन प्रकार आहेतविरेचन नस्य -डोके दुखणे, डोके जड होणे, सर्दी इ साठीबृहण -वातामुळे डोके दुखणे, नाक तोंड कोरडे पडणे इ साठीशमन - केस गळणे ,चेहऱ्यावरील तीळ व्यंग इ साठीमात्रे नुसार मर्श व प्रतिमर्शअसे दोन प्रकार आहेत. प्रतिमर्श नस्य हेदोन थेंब औषध रोज नाकात टाकले तरी चालते या मुळेकाही अपाय होत नाही.
नस्य कर्मवय वर्षे ७ ते 80 वर्षे या मध्ये नस्य करता येते.ज्या व्यक्तीला नस्य करायचे आहे त्याला प्रथम खांदे चेहरा कपाळ यांना तेल लावून वाफ अथवा शेक दिला जातोया नंतर त्यांना डोक्या कडचा भाग किंचित खाली जाईल अशा पद्धतीने झोपवले जाते.एक नाक पुडी बंद करून दुसया मध्ये कोमात केलेल औषध सोडले जाते नंतर दुसरी बंद करून पहिल्या मध्ये सोडले जाते.हळूहळू दोन्ही नाकपुड्या नी श्वास आत ओढला जातोया नंतर घशात आलेलं औषध व सुटलेला कफ थुंकायला सांगितले जाते.या नंतर एक ते दीड मिनिटे झोपून ठेवले जाते.घशात चिकटलेला कफ सुटावा या साठी औषधीधूर दिला जातो.या नंतर कोमटपाण्याच्या गुळण्या केल्या जातात.हे प्रक्रिया रोज ७ दिवसा पर्यंत केली जाते
नस्य फायदेश्वासोश्वास चांगला व आरामात होतोइंद्रियांना बळ मिळतेमन प्रसन्न होतेकफबाहेर पडून जातोजो रोज नस्य करतो त्याचे केस पिकत नाहीत. चेहरा प्रसन्न व खांदे उत्तम व भरदार होतात
वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com