रक्तामधील दोष हे बाहेर काढून टाकणे शक्य नसते त्यामुळे दुष्ट असे रक्त बाहेर काढून टाकले जाते.
रक्तमोक्षणवमन विरेचन बस्ती नस्य यानंतर पुढीलकर्म हे रक्तमोक्षण आहेरक्तामधील दोष हे बाहेर काढून टाकणे शक्य नसते त्यामुळे दुष्ट असे रक्त बाहेर काढून टाकले जाते.सुश्रुत संहिता मध्ये रक्त मोक्षणाला अर्धी चिकित्सा मानली आहे.
रक्त मोक्षणाचेचार प्रकार आहेत या पैकी सिरावेध व जलौका हे प्रकार जास्त प्रचलित आहेत.१)शृंग - शृंग म्हणजे शिंग. यालाच तुमडी लावणे पण म्हणता
२)अलाबू- या मध्ये पोकळ असा भोपळा रक्त काढायला वापरला जातो, हली निर्जंतुक असे प्लास्टिक कप वापरले जातात.
३)सिरावेध - सर्व देहामधील दोषयुक्त रक्त काढण्यासाठी सिरावेध हे कर्म केले जाते. या मध्ये सुई वापरून शिरेद्वारे रक्त काढले जाते. एका वेळी जास्तीत जास्त १०० ते १५० मिली रक्त काढले जाते.
४)जलौका- जळू या प्राण्याद्वारे रक्त काढले जाते याला जलौका अवचारण असे म्हणतात.जळू हा निसर्गतः रक्त पिणाराप्राणी आहे. ज्या ठिकाणी रक्त काढायचे आहे अशा ठिकाणी त्याला ठेवले असता तो रक्त पिऊ लागतो. एका वेळी १० ते २० मिली इतके रक्त तो पिऊ शकतो.जळू जेव्हा रक्त पीत असतो तेव्हा ते रक्त गोठू नये यासाठी तो रक्त पातळ करणारे द्रव्य सोडत राहतो तसेच त्याच्या मुखामध्येवेदानाशामक असे औषध असते. या मुळे त्या भागातील वेदना कमी होते.जळू सुटल्यावर त्यावर हळद लावून ते रक्त थांबवले जातेमधुमेह असताना जखम भरायला अवघड असते अशा वेळी असता जळू लावल्याने जखम लवकर भरतेजळू ही अमेरिकेच्या FDA(आरोग्य विभाग) नी मान्यता दिलेली चिकित्सा पद्धती आहे.
रक्तमोक्षण कोणी करावे?शरद ऋतू मध्ये म्हणजेच साधारण ऑक्टोबर महिन्यात पित्त व उष्णतेचे विकार वाढतात अशा वेळी ही चिकित्सा केली जाते.वैद्याच्या सल्ल्यानुसार पुढील आजारामध्ये हि चिकित्सा करता येते.वातरक्त, विद्रधी ( गळू), विसर्प (नागीण) , अंगाचा दाह होणे, एखाद्या भागाला किडा इ चावल्यामुळे येणारी सूज,त्वचेवर पुरळ अथवा गांध्या उठणे इ
वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com