शिरोधारा
डोक्यावर औषधी द्रवाची धार सोडणे याला शिरोधारा म्हणतात.आयुर्वेद पंचकर्मव रिलक्सेशन साठी सध्या शिरोधारा जास्त प्रचलित आहे.या साठी रोगानुसारतेल,तूप, दुध, ताक,कांजी,क्वाथ सिद्ध दुध, उसाचा रसअसे वेगवेगळे औषधे वापरली जातात
शिरोधारा विधीशिरोधारा शक्यतो सकाळी ७-१० मध्ये केली जातेरुग्णाला शिरोधारा करण्यासाठीच्या विशेष टेबल वर झोपवले जातेरुग्णाच्या डोळ्यावर गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या पट्ट्या ठेवल्या जातातकपाळ किंचित मागच्या बाजूला तिरके करून झोपवले जातेकपालापासून ४ बोटे वर शिरोधारा पात्र ठेवले जाते.शिरोधारा करताना शांत संगीत रुग्णाला ऐकवले जाते.
औषधे कोमट करून ते पात्रात ओतले जातेधारा संपूर्ण कपाळावर सोडलीव शक्यतो एका जागी स्थिर न ठेवता लंबगोल अशी फिरवली जातेरोग व प्रकृती नुसार ३० मिनिटे ते १ तास हि क्रिया केली जाते.खाली जमा झालेले तेल पुन्हा गरम करून वापरले जाते.शिरोधारा झाल्यानंतर टिशू पेपर किंवा टॉवेलनि तेल व्यवस्थित पुसून घेतले जाते.
शिरोधारा करता घ्यावायाची काळजी -कानात कापसाचेबोळे, डोक्याला टोपी, नाकालारुमाल बांधून मग घरी जावे.केस धुवायला आवळ्याचा काढा वापरावाव नंतर केस कोरडे ठेवण्याचे खबरदारी घ्यावी.शिरोधारे नंतर प्रसन्न मनाने विश्रांती घ्यावी.जिभेवर ताबा ठेवावा व पथ्यकर भोजन करावे
शिरोधारेचे उपयोगशिर हे सर्व इंद्रियांचे स्थान आहेमानसिक ताण , इंद्रियांचे विकारतैल धारा - केसांचे आजार , निद्रानाश , डोकीदुखी, वाताचे विकार, मानसिक ताण तणाव, भीती, उदासीनता इतक्र धारा - औषधी काढा करूनत्यामध्ये औषधी सिद्ध ताक मिसळून त्याने डोक्यावर धार धरली जाते.केस पांढरे होणे,शिरःशूल, कर्णरोग, डोक्यात होणारा कोंडा, त्वचा विकार इत्यादी
वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com9272136237